top of page
Pedli Dam

Pedli Dam

Sudhagad

Sudhagad

Understanding Nature

Sudhagad 1998

Sudhagad 1998

Zirad camp - cart safari

Zirad camp - cart safari

Donating Clothes in Hilly villages

Donating Clothes in Hilly villages

Nandgav

Nandgav

Cleaning beaches and Forts

Nagav

Nagav

Aakar Pot Art

Aakar Pot Art

Hands On activities

Nandgav Camp

Nandgav Camp

Medha

Medha

Aagastya Foundation

Aagastya Foundation

Raigad Muktangan 
welcomes you

No machine gives 100 percent efficient results, but giving inputs to children always gives infinetly efficient results.

DSCN0560.JPG

About

Our Roots

रायगड मुक्तांगण

मुलांसाठी चालू केलेला हा एक उपक्रम. मुलांना नवनवीन गोष्टींची माहिती , व्यावाहारिक अनुभव मिळावे म्हणून सुरू केलेला प्रोजेक्ट आणि त्यासाठी असलेले एक खुले अंगण म्हणजेच आमचे मुक्तांगण. एका फार छोट्याशा उद्देशाने सुरू केलेला उपक्रम पण त्याचे महत्व आणि त्यासाठी लागणारी मेहनत याचे खरे रूप एक दोन वर्षातच समोर आले. त्यामुळे या विचारांचा आणि उपक्रमांचा प्रवाह चालतच राहिला. वाटेत नवीन प्रवाह मिळत गेले काही तुटत गेले पण मुक्तांगण अजून चालूच आहे .सुरवातीच्या काळात फक्त मान्यवर संस्थांचे सहाय्य घेऊन त्यांचे एक चाहते किंवा अनुकरण कर्त्ये म्हणुन त्यांचे उपक्रम चालवणे हा एकमेव उद्देश ठेवला होता.त्यांच्या विचारांची एक बैठक आपल्या परिसरात रुजू करणे हा मुख्य भाग होता. यासाठी त्यांचे मुलांसाठीच असलेले मासिक आणि दिवाळी अंक याचा संदर्भ घेऊन वाटचाल करणे.त्यांच्या संस्थांचे विश्वस्थ , कार्यकर्ते आणि विदयार्थी यांचे मार्गदर्शन घेऊन वाटचाल करणे हे त्यांना अपेक्षित होते आणि त्यांचे मुख्य ध्येय सुध्दा होते. त्यामुळे ते पाळणे आम्हाला कालांतराने जड  गेले .आमचा टाउनशिप परिसर हा विविध गुणांनी, विविध विचारांनी भरलेला आहे. कॉलनीत वेगवेगळ्या विचारसरणीची लोक रहात होते आणि अजूनही राहतात. त्यामुळे इथे उपक्रम चालवणे तशी तारेवरची कसरत असायची. आपल्या उपक्रमांद्वारे कोण कोणते संदेश जाऊ शकतात याचा सारासार विचार करायला लागायचा. त्यामुळे उपक्रम ठरवताना कुठल्याही बाबतीत धार्मिक , शैक्षणिक किँवा इतर बाबतीत डावे उजवे होता कामा नये याची काळजी घ्यावी लागत असे.

            सुरवातीच्या काळात संस्थेच्या मोठ्या नावामुळे बरेच लोक आकर्षित झाले.त्यातील मी एक होतो. आम्ही समविचारी म्हणा किंवा संस्थेच्या नावाच्या वलयामुळे म्हणा आम्ही एकत्र जमलो. ज्या लोकांनी याची ओळख करून दिली त्यांच्यासोबत बैठकी झाल्या.मग आम्ही त्यांच्या कार्यकर्ता शिबिरात मोठ्या उत्साहाने भाग घेतला. सर्वजण खूप चार्ज झाले होते. त्यामुळे काही महिने उपक्रम १० ते १५ कार्यकर्त्या सोबत पार पडले. नंतर मात्र संख्या रोडावली आणि चार पाचवर येऊन थांबली. याची कारणे वेगवेगळी होती. कुणाला ऑफिसच्या कामाच्या वेळेमुळे, काहींना कामाचे स्वरूप न आवडल्यामुळे तर कुणाचे वैचारिक मतभेद झाल्याने ती संख्या कमी झाली.पण मुलांचा प्रतिसाद मात्र चांगला होता.वीस पंचवीस मुले कायम येत होती.

शिबिर हा कार्यक्रमाचा आत्मा होता आणि आजसुध्दा आहे.एक दिवसाचे असो किंवा निवासी असो यात महिन्याभरात, वर्षभरात जेवढे उपक्रम राबवले जायचे त्याचे एक प्रॅक्टिकल एप्लिकेशन्स यात व्हायचे.यातूनच मुंलाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळायची.मुले शिबिरे, पावसाळी सहली, प्रकल्प भेटी यासाठी खास रविवारचे उपक्रम अटेंड करायचे. तसा नियम होता की जो सदस्य नेहमीच्या उपक्रमांना यायचा त्यांनाच प्राधान्य देण्यात यायचे. पहिल्या दोन तीन वर्षातच कार्यकर्ता संख्या दोन तीन वर पोहचली.मग मी सर्वांना सांगितलें तुम्हाला ज्यावेळी शक्य आहे त्यावेळी येत जा.मग त्यांनी शिबिरांना यायला सुरवात केली. नंतर काही पालकच येऊन मिळाले.मग दोन तीन लोकांना घेऊन कार्यक्रम चालूच ठेवले.एक दिवसीय शिबीर, मुलाखती,कॉलनीत होणाऱ्या विवीध गुणदर्शन स्पर्धा, नृत्य,नाटक , चित्रकला स्पर्धा यासाठी मात्र बऱ्याच जणांनी सहकार्य केले. मुक्तांगण सदस्य हे या सर्व उपक्रमात अग्रेसर असत.अगदी शाळेतील रँकिंग पासुन ते नृत्य स्पर्धा पर्यंत मुक्तांगण सदस्य पुढे असत. यासाठी टाउनशिप मधील विविध मंडळ, क्लब यांचे जेवढे उपक्रम होत असत त्याचा पुरेपूर फायदा आम्ही करून घेत असू.अगदी काही वेळा तर त्यांचे पूर्ण नियोजन मुक्तांगण ग्रूप करत असे.यात मान्यवरांच्या मुलाखती, शिवजयंती उत्सवातील भाषणे, गणेश उत्सव मधील स्पर्धा, विज्ञान प्रदर्शने यात मुक्तांगण सदस्य नेहमी पुढे असत.गणतंत्र दिनाच्या रॅलीचे बरेच उपक्रम ग्रुपने केले होते.

              हे सर्व उपक्रम राबवताना आम्ही टाऊनशिप मधील सर्व रहिवाश्यांच्याविविध विचासरणीचा विचार प्रामुख्याने केला. आमचे सदस्य हा एकमेव धागा पकडून काम करत आलो . त्याचे आई वडील काय करतात,त्या मुलाची शैक्षिणक प्रगती चांगलीं आहे का? अशा बऱ्याच गोष्टींचा आम्ही कधीही बाऊ केला नाही.प्रत्येक पालक, पाल्य हा वेगळा असतो.आपल्याला त्यात काही चांगल  करता येईल काय आणि त्यातूनच आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात नवीन गोष्टीची भर पडेल या उद्देशाने नेहमीच वाटचाल चालू ठेवली.अगदी १९९८ पासुन ते मार्च २०२० पर्यंत नित्य नियमाने कार्यक्रम चालु होते. कोविड काळात रविवारचे उपक्रम बंद झाले परंतु काही ऑनलाईन उपक्रम मात्र चालु ठेवले. आजपर्यंत ६०० च्यावर उपक्रम झाले आहेत. त्यात ३५ शिबिरे,३० मान्यवर लोकांच्या मुलाखती, प्रकल्प भेटी, विज्ञान प्रदर्शने भेटी,२५ किल्ल्यांची भटकंती, पावसाळी सहली आणि मागील सर्व वर्षातील प्रत्येक रविवारचे उपक्रम फक्त उन्हाळा आणि दिवाळी या सुट्या सोडुन, कॉलनीत आयोजित केलेल्या विविध क्लबच्या उपक्रमात सहभाग घेणे यांचाही समावेश आहे.

यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे खूप मुलांशी आणि पालकांशी संवाद साधता आला. त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी शिकता आल्या, शेअर करता आल्या. बऱ्याच पालकांशी मुलांच्या विषयी विविध विचारांची देवाण घेवाण करता आली. मुक्तांगण या नावाला साजेल असे काम आमच्याकडून घडत गेले.असे उपक्रम आमच्याकडून घडावेत यासाठी प्रयत्नशील असू.

diaries.jpg

Camp Diaries

DSCN9919.JPG

Raigad Muktangan Team

2022 event list

Here's the list of all events that were successfully organized in 2022 :
18 camps
26 indoor activities

Contact Muktangan

RIL Township,Nagothane

Thanks for submitting !!!

bottom of page